प्राचार्य सतिश वाघमारे लिखित ‘एअर जिम’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

0
289

पिंपरी दि.३० (पीसीबी) :बीड जिल्हा मुप्टा संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी तुषार ठोंबरे (अप्पर जिल्हाअधिकारी,बीड)यांच्या शुभहस्ते प्राचार्य सतिश वाघमारे लिखित “एअर जिम” पुस्तकाचे थाटात प्रकाशन करण्यात आहे.या पुस्तकात ओपन जिमवरील उत्तम मार्गदर्शन करणारे आहे.ओपन जिम वरील पहिलेच पुस्तक आहे.या पुस्तकात मधुमेह,ह्रदयविकार,संधीवात, कंबर दुखी,गुडघेदुखी,मानदुखी, सांधेदुखी,आहार,मसाज,योगासने या सर्व गोष्टीचे अभ्यासपुर्वक मार्गदर्शन करण्यात आले आहे.याचसाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

कार्यक्रम अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे(मुख्य संपादक-मुप्टा न्यूज) होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,शिक्षणाधिकारी विक्रम सारुक,प्रा.डाॅ.राजेंद्र गोणारकर,प्रा.सुनील मगरे,संदीप उपरे,नानासाहेब हजारे,प्रा.डाॅ.संभाजी वाघमारे,प्रा.डाॅ.हर्षवर्धन कोल्हापुरे,शिवराम म्हस्के इ.अनेक मान्यवर व बीड जिल्हा मुप्ट संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.हा कार्यक्रम तुलसी इंग्लिश स्कुल सभागृह,बीड येथे संपन्न झाला.