प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार

Maharashtra

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार

By PCB Author

February 22, 2020

अकोट, दि.२२ (पीसीबी) – प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार नाजूकराव पुंडकर यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना २१ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी रात्री १० वाजता अकोट शहर पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस पोलिस वसाहतीच्या हद्दीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे अकोट शहर पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस पोलीस वसाहतीतून २१ फेब्रुवारी (शुक्रवारी) रोजी रात्री १० वाजता येत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे पुंडकर काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेऊन पुंडकर यांना अकोट ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावर एक गावठी बनावट पिस्टल आणि दोन काडतूसे आढळली आहे. घटनास्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल सोनवने, अकोट शहराचे ठाणेदार संतोष महल्ले, अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी भेट दिली. हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला कि राजकीय वादातून याविषयी पोलीस तपास करीत आहेत.

तुषार पुंडकर हे शासकिय दुध डेअरीचे जिल्हाध्यक्ष आहेत. यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोट विधानसभा निवडणुक लढविली होती. पोलिसांनी आरोपीच्या शोधात तपास पथके रवाना केले आहेत.