प्रसुतीनंतर शासकीय रूग्णालयात नवजात बाळासह जमिनीवर झोपावं लागलं

0
485

सांगली, दि.१८ (पीसीबी) – प्रसुतीनंतर एका महिलेला शासकीय रूग्णालयात नवजात बाळासह जमिनीवर झोपावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गर्भवती रूग्णांची संख्या जास्त असल्याने बेड उपलब्ध होऊ शकला नाही, असं स्पष्टीकरण रूग्णालय प्रशासनाने दिलं आहे. सांगलीमधील शासकीय रूग्णालयात हा प्रकार घडला आहे.

रूग्णालयात अधिक बेड वाढवून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यास रूग्णांना सुविधा देणं शक्य होईल, असं रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. धुमाळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा अनोगोंदी कारभार समोर आला आहे.