Banner News

प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

By PCB Author

May 06, 2020

पिंपरी दि-६: पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे आज हृद्यविकारकने निधन झाले. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला ३९वा वाढदिवस साजरा केला.

सम्राट मोझे यांनी आपले लाहनपण चिंचवड गावात व्यतीत केले, त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले होते नन्तर ते पुण्यात स्थायिक झाले. वडील रामभाऊ मोझे यांच्या राजकीय कारकीर्तिमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला.

सम्राट मोझे यांनी काही दिवसांपूर्वीच बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून त्यांची बदनामी केली जात असल्याची पोलीस सायबर सेलला तक्रार दिली होती.