Pimpri

प्रशासनाचे नियम न पळणा-या 150 जणांवर कारवाई

By PCB Author

October 14, 2020

पिंपरी, दि. 14 (पीसीबी) :  प्रशासनाचे नियम न पळणा-या 150 जणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची लागण होणा-या रुग्णांची संख्या घटली आहे. संख्या घटली असली तरी धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी हलगर्जीपणा करू नये, असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मंगळवारी (दि. 13) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (2), भोसरी (6), पिंपरी (2), चिंचवड (1), निगडी (12), आळंदी (18), चाकण (0), दिघी (2), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (30), वाकड (30), हिंजवडी (8), देहूरोड (10), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (7), रावेत चौकी (7), शिरगाव चौकी (9)