Desh

प्रवाशांचे सामान न घेताच जम्मूला पोहोचले विमान

By PCB Author

November 05, 2018

नवी दिल्ली, दि.५ (पीसीबी) – गो एअर (GoAir) कंपनीच्या विमानाने चक्क प्रवाशांचे सामान न घेताच उड्डाण केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. रविवारी गो एअरच्या श्रीनगर येथून जम्मू जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला. विमान जम्मूला पोहोचल्यानंतर प्रवाशांच्या ही बाब लक्षात आली, त्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

या विमानातील एका प्रवाश्याने जम्मूवरुन पोन करुन ‘पीटीआय भाषा’ला या संदर्भातील माहिती दिली. आम्ही गो एअरच्या जी८-२१३ या विमानाने हे श्रीनगरवरून जम्मूला पोहोचलो. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आमचे सामान विमानात चढवलेच नाही. प्रवाशांनी सामानाची विचारणा केल्यानंतर थोडावेळ वाट पाहायला सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या विमानाने त्यांचे सामान जम्मूमध्ये आणले जाईल असे त्यांना सांगण्यात आले. एक तासाहून जास्त वेळ वाट पाहिल्यानंतर उद्या येवून सामान घेवून जा असे उत्तर गो एअरकडून देण्यात आले. सामान चढवण्याच्या नियमांमुळे काही प्रवाशांचे सामान विमानात चढवण्यात आले नव्हते.