प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर; १८ वर्षांनी लहान कझाकिस्तानी मॉडेलसोबत केले लग्न

0
700

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन याने तिसरे लग्न केले आहे. राहुल ४३ वर्षांचा असून, त्याने २५ वर्षांची कझाकिस्तानी मॉडेल नताल्या इलीनासोबत बोहल्यावर चढला आहे. राहुल महाजन याने २००६ मध्ये पायलट असलेल्या श्वेता सिंह हिच्यासोबत पहिले लग्न केले होते. त्यांचे लग्न दोन वर्षे टिकले. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर राहुलने २०१० मध्ये दुन्हनिया ले जायेंगे या टिव्ही शोमधील डींपी या मॉडेलशी लग्न केले. चार वर्षांनंतर म्हणजे २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.