प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांकडून केरळ पूरग्रस्तांसाठी १५ पोती धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत

520

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक, विद्यार्थी व मातृ विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी १५ पोती धान्य व जीवनावश्यक वस्तू जमा करण्यात आले. जमा झालेले धान्य व जीवनावश्यक वस्तू प्रशासनाकडे देण्यात आले.

भाजपचे कार्यकर्ते शशिकांत पाटील यांनी पुढाकार घेत प्रभाग क्रमांक १६ मधील वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर व परिसरात केरळ पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू संकलन मोहिम राबविण्यात आले. त्यामध्ये नागरिक, विद्यार्थी, मातृ विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच चिंतामणी गणेश मंडळाचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. या सर्वांनी प्रभागात मोहिम राबवून १५ पोती धान्य आणि जीवनावश्यक वस्तू जमा केले.

केरळ पूरग्रस्तांसाठी जमा करण्यात आलेले धान्य व जीवनावश्यक वस्तू प्रशासनाकडे सोपविण्यात आले. ते प्रशासनामार्फत पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक नामदेव ढाके, प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, भाजप व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, शेखर चिंचवडे, पाटीलबुवा चिंचवडे, सचिन शिवले, हेमंत ननवरे, दिलीप गडदे, बापू पाटील, प्रदिप नेते, प्रसाद राऊत, मनोज पाटील, मिलिंद वाघ, डॉ. अभिजीत, चिंतामणी गणेश मंडळाचे राजकुमार काळे, अशोक येलमार आदी उपस्थित होते.