“प्रदीर्घ संसदिय अनुभव असणारे अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड”

0
332

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. आज दुपारी १२ वाजता दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रिय अर्थमंत्री, ज्येष्ठ विधिज्ञ अरुण जेटली यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने प्रदीर्घ संसदिय अनुभव असणारे एक अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा भावना सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी नेहमीच विरोधी पक्षातल्या नेत्यांना आपलंस केले. ते नेहमी विरोधी पक्षातल्या नेत्यांना मार्गदर्शन करत, अशा आठवणी सुळे यांनी सांगितल्या.