Pimpri

प्रथम मतदानाचा क्षण ऐतिहासिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृतीचा निर्धार…

By PCB Author

April 11, 2024

“आम्ही १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उत्सुक असून या निवडणुकीत प्रथमच मतदान करणार असल्याने हा क्षण ऐतिहासिक होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत त्यासाठी जास्तीत जास्त मित्र परिवारात,नातेवाईकांत मतदानाचा प्रचार करून आम्ही आमचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू असा विश्वास निगडी येथील मैत्री ग्रुपच्या नवोदित पन्नासहून अधिक महाविद्यालयीन नवोदीत मतदारांनी व्यक्त केला.

आकुर्डी,प्राधिकरण व परिसरातील म्हाळसाकांत कॉलेज, प्रा.रामकृष्ण मोरे कॉलेज,डॉ. डी वाय पाटील कॉलेज या महाविद्यालय विद्यार्थ्यां-विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा सेक्टर २६ मधील एका हॉटेलमध्ये संपन्न झाला,त्यावेळी २०६ पिंपरी विधानसभा कार्यालयाचे नोडल अधिकारी विजय भोजने,मुकेश कोळप,प्रफुल्ल पुराणिक तसेच राजेंद्र कांगुडे, दिनेश जगताप, महालिंग मुळे आदी सहका-यांनी तेथे उपस्थित राहून मतदान जनजागृती केली.

यावेळी उपस्थित महाविद्यालय मतदारांनी लोकशाही प्रती जागृत राहू आणि जात, समुदाय, भाषा व इतर कोणते प्रकारच्या प्रलोभनास बळी न पडता निर्भीडपणे मतदान करून लोकशाही उत्सवात सहभागी होऊ असा निर्धार करून निषपक्षपणे व शांततेमध्ये मतदान शपथ करण्याची शपथ घेतली.