प्रथमच नगरसेविका झालेल्या निर्मला कुटे यांचे काम कौतुकास्पद – आमदार लक्ष्मण जगताप

887

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – निर्मला कुटे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. प्रथमच निवडून येऊनही गेल्या दीड वर्षातील त्यांचे काम कौतुकास्पद आहे. सातत्याने पाठपुरावा करून त्या प्रभागातील कामे मार्गी लावतात. पिंपळेसौदागर परिसरात पुढील २० वर्षांचे नियोजन करूनच कामे केली जात आहेत. या भागाच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि. १८) केले.

पिंपळेसौदागर प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका निर्मला कुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे विजयादशमीच्या मुहूर्तावर आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, गोपाळ माळेकर, नगरसेविका आरती चोंधे, सुनिता तापकीर, निता पाडाळे, सविता खुळे, पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, संजय कुटे आदी उपस्थित होते.

लक्ष्मण जगताप म्हणाले, “पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेविका निर्मला कुटे यांचे प्रभागात चांगले काम सुरू आहे. प्रभागात विकासकामांचा डोंगर उभा राहिला पाहिजे यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या या जनसेवेचे फळ त्यांना नक्कीच मिळणार आहे. पिंपळे सौदागर परिसरात झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पाण्याची थोडी कमतरता भासत असली तरी, येत्या वर्षभरात येथील पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे. पुढील २० वर्षे डोळ्यासमोर ठेऊन या प्रभागात कामे केली जात आहेत. कुठल्याही विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. संरक्षण खात्यातील बंद असलेला रस्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच तो देखील प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर कुटे यांनी केले. युवा नेते संकेत कुटे यांनी आभार मानले.