प्रत्येक पूरग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी कर्ज काढू – चंद्रकांत पाटील

0
564

पुणे, दि. १४ (पीसीबी) – सांगली आणि कोल्हापुरातील प्रत्येक पूरग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. प्रसंगी त्यासाठी कर्ज काढू,  असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (बुधवार) येथे म्हटले आहे. पुण्यात शासकीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात ४ लाख ५३ हजार लोकांना पुरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढले आहे.  पुरामुळे कोणी अडकले नाही. तसेच राज्यात ५०० च्या वर निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. या निवारा केंद्रात ३ लाखापेक्षा जास्त लोक राहत आहेत. कोल्हापूरमध्ये २ कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. पुराचा फटका बसलेल्या गावाचे पुनर्वसन सहा ते आठ महिने चालणार आहे.

प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला जाणार आहे. कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त गावे दत्तक घेण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ति पुढे येत आहेत. त्यामध्ये पंढरपूर देवस्थान ५ आणि नाना पाटेकर यांची नाम संस्था २ गावे दत्तक घेणार आहे,  असे त्यांनी सांगितले.