Notifications

प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार – सरन्यायाधीश दीपक मिश्रा   

By PCB Author

September 09, 2018

पुणे, दि. ९ (पीसीबी) – कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती आत्महत्या करु शकत नाही.  मात्र, प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीला दुर्धर आजाराने ग्रासले असेल आणि त्याला इच्छा मरण हवे असेल, तर तो ‘इच्छामरणाचे मृत्यूपत्र’ बनवू शकतो’, ‘अंतिम श्वास कधी घ्यायचा याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण संबंधित व्यक्तीवर कोणत्याही दबाव नसावा’, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा  यांनी व्यक्त केले आहे.