Desh

प्रत्येकाने शाकाहारी व्हावे असे सांगू शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

By PCB Author

October 12, 2018

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – देशात प्रत्येकाने शाकाहारी व्हावे, असे आदेश देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांना सुनावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता थेट फेब्रुवारी २०१९ मध्ये होणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात मांसनिर्यातीविरोधात याचिका दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले. देशात प्रत्येकाने शाकाहारी व्हावे, असे तुम्हाला वाटते का?, आम्ही प्रत्येकाला शाकाहारी व्हा, असे सांगू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मदन लोकूर यांनी याचिकाकर्त्यांना सुनावले.