Maharashtra

प्रत्येकाची चौकशी करून त्यांना वागणूक द्या – उदयनराजे भोसले

By PCB Author

March 30, 2020

 

सातारा, दि.३० (पीसीबी) – कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वानी घरी थांबून संसर्ग रोकावा, यासाठी पोलीस दिवस रात्र सक्रिय आहेत. पण काही ठिकाणी विनाकारण मारहाणीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलीसांना काही सूचना केल्या आहेत.

काम नसणाऱ्या आणि अत्यावश्यक कामासाठी बाहेर आलेल्या लोकांना पोलिसांकडून मारहाणीच्या घटना घडत आहेत. प्रत्येकाला एकाच मापात मोजता येणार नाही. प्रत्येकाची चौकशी करून त्यांना वागणूक मिळावी, अशी सूचना सातारचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस प्रशासनास केली आहे.

उदयनराजे यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील पोलीस बांधव दिवस रात्र महाराष्ट्र वासीयांच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. काम नसताना घराबाहेर पडणाऱ्यांना मारहाणीच्या घटना आपण पाहत आहोत. पण प्रत्येकाला एकाच मापात मोजता येणार नाही अत्यावश्यक कामासाठी बाहेर आलेल्या लोकांना पण मारहाणीच्या घटना होत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. रस्त्यावर येणाऱ्या लोकांची योग्य ती चौकशी करूनच त्यांना वागणूक मिळावी. भाजीपाला, किराणा, दुध, मेडिकल, ATM मध्ये जायचे असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता पोलीस बांधवांनी सहकार्य करावे व आपले कर्तव्य पार पाडावे.

याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. रस्त्यावर येणाऱ्या लोकांची योग्य ती चौकशी करूनच त्यांना वागणूक मिळावी. भाजीपाला, किराणा, दुध, मेडिकल, ATM मध्ये जायचं असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता पोलीस बांधवांनी सहकार्य करावे व आपले कर्तव्य पार पाडावे.

— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 26, 2020