Maharashtra

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

By PCB Author

December 13, 2018

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरूवार) नोटीस पाठवली आहे.  निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी फौजदारी गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप याचिकाकर्ते सतीश उके यांनी केला आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रात यासंबंधी माहिती न दिल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान, यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने फडणवीसांना या प्रकरणात दिलासा दिला होता. मात्र, याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता न्यायालयाच्या  या नोटीशीवर मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.