प्रणिती खासदार बनसोडेंबद्दल चुकून बोलली; सुशिलकुमार शिंदेंचा खुलासा

0
1413

पुणे, दि. ३० (पीसीबी) – खासदार शरद बनसोडे यांच्याबद्दल जे काही बोलले,  ते चुकून बोलले आहे. पप्पा माझी जीभ घसरली. पण मला खासदार बनसोडेंबद्दल असे काही बोलायचे नव्हते, असे प्रणितीने मला फोन करून सांगितले होते, असा खुलासा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (मंगळवार) पुण्यात बोलताना केला.    

एका कार्यक्रमासाठी शिंदे  पुण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, बनसोडे यांच्याबद्दल प्रणितीला आणि मलादेखील आदर आहे.  आमच्या मनात त्यांच्याबद्दल  कोणतीही वाईट भावना नाही. प्रणिती चुकून बोलली आणि वर्तमानपत्रांनी तेच विधान छापले, असे  सुशीलकुमार शिंदे  म्हणाले.

बनसोडे यांच्याबाबत प्रणिती यांनी काढलेल्या वादग्रस्त विधानावर बनसोडे यांनीही आरोप केले होते.  या आरोप-प्रत्यारोपांवर राजकीय वर्तुळात  मोठी चर्चा सुरू होती. यावर   शिंदे यांनी सारवासारव करून या विषयावर पडदा टाकण्याचा  प्रयत्न केला. प्रणिती   चुकून बोललेली आहे.आता हा वाद संपलेला आहे. बनसोडे यांच्याबद्दल आम्हा दोघांनाही आदर असल्याचे शिंदे म्हणाले.