Bhosari

प्रजासत्ताक दिनानिमित्त भोसरीतील ओम हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन

By PCB Author

January 19, 2019

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – प्रजासत्ताक दिनानिमित्त भोसरी येथील ओम हॉस्पिटलच्या वतीने २१ ते ३१ जानेवारी दरम्यान महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सर्व गरजू रुग्णांची हृदयरोग व मधुमेहाची मोफत तपासणी केली जाणार आहे.

ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक अग्रवाल म्हणाले, “स्वस्थ भारत, सक्षक्त भारत, निरोगी व रोगमुक्त शहर ही संकल्पना समोर ठेवून आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबीरात मधुमेह आणि ई.सी.जी तपासणी करण्यात येईल. तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे औषधोपचाराविषयी मोफत सल्लाही देण्यात येणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह आणि हृदयरोग रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे आरोग्यावर दुषपरिणाम होतो. म्हणूनच मधुमेहासोबत हृदयरोगाचे वेळीच निदान होणे आवश्यक असते. म्हणूनच मधुमेहाची तपासणीबाबत जनजागृती व्हावी ही सामाजिक बांधिलकी जपत ओम हॉस्पिटलच्यावतीने या मोफत तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. आरोग्य शिबीराच्या अधिक माहितीसाठी 7774049690, 7774049691, 7774049698 या नंबरवर संर्पक साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.”