प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्राचा रक्षाबंधन उत्साहात साजरा

0
1077

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरीतील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रसार माध्यम, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, मिलिटरी ऑफिस, पोस्ट ऑफिस, विविध रुग्णालये, शाळा, विविध महाविद्यालये, राजकीय प्रतिनिधी आदी ठिकाणी आज (रविवारी) रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक (गुन्हे), रंगनाथ उंडे, सी.ओ.डी.राकेश कुमार, ब्रिगेडियर नवप्रीत सिंग, विनोद गुरुंग, पोस्टमास्तर अनुप नहाटे, रेल्वे स्टेशन प्रबंधक नरेंद्र ढवळे आदी उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त पवित्र राखी बांधून आपण ईश्वराशी संबंध जोडतो. ईश्वरीय शक्ती व वरदानांची प्राप्ती त्यामुळे होते. परमात्मा शिव सर्व आत्म्यांचा पिता आहे. जीवनाला अध्यात्मिक मूल्यांनी भरपूर करून शांती व शुभ भावनेद्वारे व्यवहारात स्नेह, सहानुभूती दिव्यता व मधुरता इत्यादी दिव्य गुणांना धारण करून संस्कार परिवर्तनाद्वारे विश्वपरिवर्तनाच्या श्रेष्ठ कार्यात आपण सहयोगी बना असा ईश्वरीय संदेश पिंपरी सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुरेखा यांनी दिला.

या कार्यक्रमांचे आयोजन ब्र.कु.सुरेखा, सुप्रिया, अपर्णा विटवेकर, पूजा नावानी, अनुष्का डे, शैला देसाई, अनुप पाटील, सरदार पाटील, निलेश थोरात यांनी केले.