Pune

प्रचाराच्या दगदगीमुळे रोहित पवारला रूग्णालयात दाखल होण्याची वेळ  

By PCB Author

April 07, 2019

पुणे, दि. ७ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार आजारी असून त्यांच्यावर हडपसर येथील नोबेल रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

कोणतीही गोष्ट अंगावर काढली की वाढत जाते आणि हॉस्पीटलचे दौरे करावे लागतात. तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे गेले तीन दिवस नोबेल रुग्णालयात  अॅडमीट व्हावे लागले. ऑपरेशन करावे लागले. या काळात पक्षाचे कार्यकर्ते, मित्र हितचिंतक यांनी काळजीतून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना उत्तर देता आली नाहीत. हॉस्पीटलचे डॉक्टर, नर्सेस यांनी अहोरात्र काळजी घेतल्याने मी आत्ता पुर्णपणे बरा असून पुन्हा त्याच जोशाने प्रचारास सुरवात करत आहे.

माझी आपणा सर्वांनी हिच विनंती आहे की, आपण दिवसरात्र पक्षाच्या प्रचारासाठी सक्रीय राहत आहात. वाढत्या उन्हाची तमा न बाळगता प्रचार करत आहात, पण आपण देखील तब्येतीची काळजी घ्या. आपल्या सर्वांच्या कष्टामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा विजय होणार हे निश्चित आहे.  फक्त त्याचसोबत आपली तब्येत तितकीच जपणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार, असे रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.