प्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच- उद्धव ठाकरे

0
339

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले असून दलित व मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांकडून ही अपेक्षा नव्हती, असे शिवसेनेने म्हटले आहे.