“पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन बांग्लादेशी घुसखोर ओळखतो”

0
325

देश,दि.२४(पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी “पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन बांग्लादेशी घुसखोर ओळखतो”, असा अजब दावा केला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याचंही विजयवर्गीयांनी समर्थन केलं. इंदौरमध्ये एका सभेला ते संबोधित करत होते.

‘मजुरांच्या पोहे खाण्याच्या शैलीवरुन मला समजलं की ते बांग्लादेशी आहेत. मी मजुरांशी बोललो, तेव्हा ते पश्चिम बंगालच्या कोणत्या जिल्ह्यात किंवा खेड्यात राहतात हेदेखील सांगू शकले नव्हते’ असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले.

एक बांग्लादेशी तरुण दीड वर्ष इंदौरच्या आझाद नगर भागात राहत होता आणि माझी ‘रेकी’ करत होता. त्याच्या अटकेनंतर या गोष्टीचा खुलासा झाला, त्यामुळे माझ्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली, असंही विजयवर्गीय म्हणाले.

मी अद्याप या संदर्भात तक्रार दाखल केलेली नाही, परंतु तुम्ही सावध राहिलं पाहिजे. घुसखोर देशातील वातावरण बिघडवत आहेत, असं सांगत कैलाश विजयवर्गीय यांनी उपस्थितांना सावधतेचा इशारा दिला.