Desh

पोलीस व्हॅनमधून खेचून जमावाने केली तरुणाची हत्या

By PCB Author

November 28, 2018

शामली, दि. २८ (पीसीबी) – उत्तर प्रदेशमधील शामली येथे पोलिसांसमक्ष पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या एका तरुणाला खाली खेचून जमावाने त्याची हत्या केली. ही घटना शामली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या झिंझाना परिसरातील हथछोया गावात घडली. दरम्यान, पोलिसांसमक्ष हा प्रकार घडल्याचा आरोप पोलीस अधीक्षकांनी फेटाळला आहे.

राजेंद्र कश्यप असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र हथछोया गावात राहत होता. त्याचे गावातील काही लोकांबरोबर वाद झाला होता. त्याचवेळी गावातील काही लोकांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर पोलीस राजेंद्र कश्यपला वाचवण्यासाठी घटनास्थळी आले. पोलिसांनी राजेंद्रला आपल्या ताब्यात घेतले. मारहाणीनंतरही लोकांचा समूह शांत होत नव्हता. पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या राजेंद्रला बाहेर खेचून लोकांनी त्याला पुन्हा मारायला सुरुवात केली. या मारहाणीतच राजेंद्रचा मृत्यू झाला. परंतु, पोलिसांनी त्यावेळी तिथे उपस्थित नसल्याचे म्हटले आहे.

लोक एका व्हिडिओत राजेंद्रला मारहाण करत असताना दिसत आहेत. या घटनेत प्राथमिकदृष्टया पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून येतो. त्यामुळे त्यावेळी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात विभागीय कारवाईचे आदेश दिल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी ट्विटरवरुन सांगितले.