Maharashtra

पोलीस ठाण्यात स्वत:वर गोळी झाडून हवालदाराची आत्महत्या

By PCB Author

December 24, 2020

नालासोपारा, दि.२३ (पीसीबी) : तुळींज पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे. आश्चर्य म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच त्यांनी स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली आहे. पोलीस हवालदार सखाराम भोये (42) असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून आत्महत्येच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या चार वर्षापासून पालघर जिह्याच्या तुळींज पोलीस ठाण्यात ते हवालदार म्हणून कार्यरत होते. या आत्महत्येने पोलीस गटात शोकाकुल वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे.