पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी जाणून घेतल्या हिंजवडीतील वाहतूक समस्या

0
892

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के.पद्मनाभन यांनी हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या जाणून घेण्यासाठी आज (सोमवार) सायंकाळी पाचच्या सुमारास हिंजवडी परिसराची पाहणी करुन हिंजवडीतील शिवाजी चौकास भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील स्थानिक नागरिक, आयटी कंपन्यांतील कर्चचारी आणि वाहतूक पोलिसांकडून वाहतूक संदर्भातील समस्या जाणून घेतल्या.  

या पाहणी दौऱ्यामुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुण्यातून हिंजवडीत जाण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे साडे तीन ते चार तास लागतात. तसेच पिंपरी परिसरातून हिंजवडीत जाण्यासाठी एका लागतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास उशिर होतो. वाहनांच्या इंधनावरही मोठा खर्च होत आहे. याचा छोट्या कंपन्यांना फटका बसत आहे.