पोलिस मुख्यालयात ठेवा डुकरे

0
389

नागपूर, दि, २२ (पीसीबी) – चोर, दरोडेखोरांना जेरबंद करणे, असामाजिक तत्त्वांना कोठडीत डांबून नागरिकांचे संरक्षण करण्याची, एकूणच कायदा व सुव्यवस्थेची घडी नीट राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांवर आता चक्क डुकरांचेही संरक्षण करण्याची जबाबदारी आली आहे. शहरातील मोकाट डुकरांना पकडण्यासाठी महापालिकेने विशेष.

थकातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्त मागितला असून, जमा करण्यात आलेली डुकरे काटोल मार्गावरील चक्क पोलिस मुख्यालयात ठेवण्याची विनंती करणारे अजब पत्र पोलिस विभागाला दिले आहे. त्यामुळे आता पोलिसांवर डुकरांच्याही संरक्षणाची जबाबदारी येणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोकाट डुकरांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेने डुकरांना पकडण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी तामिळनाडूतील २१ कर्मचाऱ्यांचे पथक नागपुरात दाखल झाले आहे. सोमवारपासून गिट्टीखदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतून पोलिस बंदोबस्तात मोकाट डुकरांना पकडण्याची मोहीम सुरू होणार आहे. यासाठी महापालिकेने पोलिस विभागाला सशुल्क पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. महापालिकेने पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार, मोकाट डुकरांना पकडण्यासाठी तामिळनाडू येथील पथकाद्वारे रोज कारवाई करण्यात येणार आहे. पकडण्यात आलेली डुकरे मोठ्या वाहनांमध्ये ठेवण्यात येतील. ही वाहने काटोल मार्गावरील पोलिस मुख्यालयाच्या मैदानात ठेवण्यात यावी. त्यामुळे डुक्कर मालकाद्वारे होणारा विरोध टाळणे शक्य होईल. मोहीम पूर्ण झाल्यानंतर मोकाट डुकरांना शहराबाहेर पोलिस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे.