पोलिस ‘बाप-लेकी’चा हृदयस्पर्शी फोटो होतोय व्हायरल

0
857

 

मुंबई, दि.५ (पीसीबी) – संपूर्ण देश कोरोना’विरुद्ध लढा देत आहे. लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते, कलाकार सर्व घरात आहेत. मात्र डॉक्टर, पोलिस आपले कर्तव्य बजावत आहे. जीव धोक्यात घालून रात्रंदिवस ते काम करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर पोलिस ‘बाप-लेकी’चा हृदयस्पर्शी फोटो होतोय व्हायरल झाला आहे. झाला आहे.

 

हा फोटो सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतो आहे. इंदोरमधल्या एका पोलिस-बाप लेकीचा हा फोटो आहे.इंदोरच्या तुकोगंज पोलिस ठाण्याचे टी.आय. निर्मल श्रीनिवास हे घराबाहेर बसून जेवण करत आहेत. आणि त्यांची चिमुरडी लेक दारात उभा राहून त्यांच्याकडे पाहत आहे तसंच ते देखील तिच्याकडे पाहत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे.

दरम्यान, आपण देशभक्तीचं काम करूया आणि घरातच बसूया, असं आवाहन करत आहे. पोलिस खात्यातल्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तसेच पोलिसांनी देखील हा फोटो शेअर केला आहे.