Chinchwad

पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

By PCB Author

November 27, 2018

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर चौकात २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, पत्रकार अनिल वडघुले, प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, गोपाल बिरारी, किरण गांधी, सुभाष मालुसरे, प्रताप भोसले, पाटीलबुवा चिंचवडे, शुभम चिंचवडे, निळकंठ कचरे, युवराज चिंचवडे, डॉ. अभिजीत भालशंकर, तेजस खेडेकर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.