पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली; काही दिवस उरले होते सेवानिवृत्तीला

0
792

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड पहिले पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची अचानक बदली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी राज्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्या नियंत्रक संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. आर.के. पद्मनाभन यांच्या सेवानिवृत्तीला काही दिवस राहिले असताना त्यांची बदली करण्यात आली असल्याने पोलिस दलात चर्चेला उधाण आले आहे. 

पुणे पोलिस आयुक्तालयाची विभागणी होऊन १५ ऑगस्ट २०१८ ला पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय  निर्माण करण्यात आले. यामध्ये पिंपरी-चिंचवडचा आणि पुणे ग्रामीण भाग समाविष्ट करण्यात आला. पहिले पोलीस आयुक्त म्हणून आर.के.पद्मनाभन यांनी सूत्रे हातात घेतली. शहरातील ऑटो क्लस्टर मध्ये तात्पुरत्या स्वरूपात पोलीस आयुक्तालयाचा कारभार सुरू करण्यात आला, पहिल्याच काही दिवसात हिंजवडीची वाहतूक कोंडीचा जटील प्रश्न सोडवला.

त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. मात्र, पोलिस दलातील गटबाजीमुळे ते ही फोल ठरल्याची चर्चा पोलीस दलात आहे. अशात ऐन विधानसभेच्या तोंडावर आणि काही दिवसात सेवानिवृत्त होणारे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आल्याने अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.