Notifications

पोलिस आयुक्तालयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी कमी होणार?

By PCB Author

August 08, 2018

पिंपरी, दि. ८ (रोहीत साबळे) – उद्योगनगरी म्हणून नावलौकीक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचे गुन्हेगारीकरण झपाट्याने होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. औद्योगिकरणामुळे शहराचा विस्तार अवाढव्य झाला. वाढते शहरीकरण, एमआयडीसी, आयटी हब यामुळे नोकरीसाठी आणि उद्योगधंद्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिकांचा ओघ येथे वाढू लागला. त्याचबरोबर शहरात गुन्हेगारी कारवायांही मोठ्या प्रमाणात वाढल्या. कामगार संघटना अस्तिवात आल्या, जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार वाढले, राजकारणाकडे वाढता कल यातून संघटीत गुन्हेगारीची पाळेमुळे घट्ट होऊ लागली. वाढत्या वाहन तोडफोडीच्या घटना, वाहन चोरी, दरोडे, चोऱ्या, खून, आत्महत्या, चेन स्कॅचिंग आदीसह शहराचा क्राईम रेट चिंताजनक वाढला. यातून शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज भासू लागली. अखेर मजल दरमजल करत पोलीस आयुक्तालयाला मंजुरी मिळाली. आता आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्टपासून सुरू होत असून पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन हे वाढता क्राईम रेट कसा नियंत्रणात आणतात? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.