पोलिसांना कोरोनाने अक्षरशः पछाडले, तब्बल २००० वर बाधित

0
254

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – कोरोनामुळे पोलीस, नर्स, पत्रकार, सफाई कर्मचारी अशा एकाही घटकाला सोडले नाही. विशेषतः दोन महिने कोरोना बंदसाठी रस्त्यावर आणि रेडझोन, संचारबंदी काळात चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिसांना अक्षरशः पछाडले आहे. तब्बल दोन हजारावर पोलीस बाधित आहेत. दुदैवाचा भाग म्हणजे २२ जणांचा मृतांच्या यादीत समावेश आहे. महत्वपूर्ण भूमिका निभवणाऱ्या, राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असून, करोना पॉझिटिव्ह असलेल्या पोलिसांच्या संख्येने आता 2 हजाराचा टप्पा आज ओलांडला आहे.

मागील चोवीस तासांत राज्यभरातील 131 पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तर, यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता 2 हजार 095 वर पोहचली आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, करोनाबाधित 2 हजार 095 पोलीसांमध्ये 236 अधिकारी व 1 हजार 859 पोलीस शिपायांचा समावेश आहे. तर आतापर्यंत उपचारानंतर बरे झालेल्या एकूण 897 पोलीसांमध्ये 75 अधिकारी व 822 पोलीस शिपाई आहेत. करोनामुळे 22 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.

पोलीस दमल्यामुळे आता निमलष्करी दलाची मदत घेण्याची वेळ राज्य सरकारवर येणार असे सांगण्यात आले. मुंबई, पुणे शहरातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने आता पोलीसांच्या मदतीला बाहेरची कुमक मिळावी अशी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र सराकरकडे मागणी केली आहे.