Pune

पोलिसांच्या निरोगी आरोग्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची संशोधक अनिल घनवट यांच्या विश्वकल्याण उपक्रमास अभ्यास भेट

By PCB Author

September 20, 2020

पुणे, दि.२०(पीसीबी) : पोलिसांच्या आरोग्यासाठी विश्वकल्याण उपक्रमाच्या संशोधनाचा अभ्यास व माहिती घेण्यासाठी मा.पोलीस आयुक्त यांनी सदिच्छा अभ्यास भेट दिली. पोलिसांचे मानसिक व शारीरिक आरोग्य, निकोप निरामय होण्यासाठी मा.पोलिस आयुक्त प्रयत्नशिल आहेत. विश्वकल्याण उपक्रम व जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेले वर्षभर जीवन शैलीचे विकार व संसर्गजन्य विकार मुक्त समाज यासाठी कार्यक्रम सुरु आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अलीकडेच श्री अशोकराव काळे व अनिल घनवट मुख्य संशोधक विश्वकल्याण उपक्रम यांनी मा.पोलिस आयुक्त यांना भेटून पोलिसदलाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत संस्थेच्या वतीने, “निरामय पोलिस दल” ऊपक्रम राबविण्याबाबत संयुक्त कार्यक्रम सादर केला.

पोलिसांना कामाचा प्रचंड ताण, अपुरे मनुष्यबळ, धावपळीचे जीवन, अवेळी आहार, यामुळे जीवनशैलीच्या विकारांना सामोरे जावे लागते. साहाजिकच, यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुध्दा कमी होते. या संदर्भात विश्वकल्याण ऊपक्रम पोलिस दलासाठी आरोग्यविषयक ऊपक्रम राबविण्याकरीता प्रयत्न करत आहेत. अलिकडील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मा.अशोकराव काळे, अध्यक्ष जगद्गुरू तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान यांनी याकामी पुढाकार घेऊन मा. पोलिस आयुक्तांना भेटून ऊपक्रमाचे महत्व समजावून सांगितले. योग, ध्यान, व्यायाम, पुरक आहार याद्वारे आरोग्यपुर्ण पोलिसदल या संकल्पनेच्या अभ्यासासाठी व ऊपक्रम समजावून घेण्यासाठी मा.पोलिस आयुक्त यांनी विश्वकल्याण ऊपक्रमास भेट दिली. याप्रसंगी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री रंगनाथ ऊंडे, डॉ व्हि एम भुक्तर, गिरीश भारंबे, गणेश तनपुरे ईत्यादी ऊपस्थीत होते. सदर कार्यक्रम यशस्वी झाल्यास निरामय आरोग्यपुर्ण पोलिस दल पहावयास मिळेल.