पॉलिसीवर लोन काढून देतो असे म्हणत केली ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक

0
266

दिघी, दि. २३ (पीसीबी) – पॉलिसीवर लोन काढून देण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एकाची चार लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 1 सप्टेंबर 2018 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत च-होली बुद्रुक येथे घडली.

अजय सुरेश दाभाडे (वय 36, रा. च-होली बुद्रुक) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 22) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन पाटील, रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क करून त्यांना पॉलिसीवर लोन काढून देण्याचे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना भारती एक्झा लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या नावाच्या पाच पॉलिसी काढण्यासाठी एकूण दोन लाख 44 हजार 322 रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर बजाज फायनान्स तर्फे लोन करून देणार असे खोटे सांगून फिर्यादी यांना लोन करून दिले नाही.

सदर लोनची फाईल रद्द करण्यासाठी सचिन पाटील व रोहित पवार या दोघांनी त्यांच्या बँक खात्यावर फिर्यादी यांच्याकडून दोन लाख 48 हजार 420 रुपये भरण्यास सांगितले. दोघांनी फिर्यादी यांची एकूण चार लाख 92 हजार 742 रुपयांची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.