पॉर्न साईटवर मोबाईल नंबर टाकण्याची धमकी देत निगडीतील तरुणीचा विनयभंग

0
1160

निगडी, दि. ७ (पीसीबी) – पॉर्न साईटवर मोबाईल नंबर टाकण्याची धमकी देऊन एका २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास घडली.

याप्रकरणी घाबरलेल्या पीडित २२ वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.६) फिर्याद दिली. त्यानुसार, प्रविण पांडुरंग जाधव (रा. मानाईक तांडा, परिसनगाव लोहा, जिल्हा नांदेड) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २२ तरुणी ही शनिवारी रात्रीच्या सुमारास तिच्या निगडीतील घरी होती. यावेळी आरोपी प्रविण जाधव या इसमाने त्यांच्या मोबाईल नंबरवरुन तरुणीच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठवला तसेच, “तु जर माझ्यासोबत झोपली नाहीस तर तुझा मोबाईल नंबर पॉर्न साईटवर टाकण्याची तसेच मारण्याची देखील धमकी दिली”. आणि तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी प्रविण विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविणला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलीस तपास करत आहेत.