पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर चिकन तोडण्याच्या सत्तुरने 32 वार

0
346

निगडी, दि. १८ (पीसीबी) – रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाला एकाने पैसे मागितले. पैसे देण्यास तरुणाने नकार दिला. या कारणावरून पैसे मागणार्‍याने शेजारी असलेल्या चिकनच्या दुकानातून चिकन तोडण्याचा सत्तुर आणला. त्या सत्तूरने तरुणावर 32 वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 17) सुखवानी प्लाझा बिल्डिंग समोर आकुर्डी येथे सकाळी घडली.

नबीन दानबहादुर कुंअर (वय 26, रा. भेळ चौक, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय पुरुषोत्तम जाधव (वय 26, रा. आकुर्डी गावठाण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नबीन हे शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास आकुर्डी येथील सुखवानी प्लाझा बिल्डिंग समोरी…