Maharashtra

पैसे आहेत, सगळे आहे, चिंता करु नका’ आता अजित पवार आपल्या पाठिशी आहेत – एकनाथ शिंदे

By PCB Author

February 05, 2020

मुंबई, दि.५ (पीसीबी) – महाविकास आघाडीच्यावतीने काल संध्याकाळी नवी मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा एकत्र कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले,’उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे नवी मुंबईत स्वागत आहे. आता अजित पवार आपल्या पाठिशी आहेत. पैसे आहेत, सगळे आहे, चिंता करु नका’ एवढे कार्यकर्ते जेव्हा रस्त्यावर उतरतील तेव्हा इतरांचे डिपॉझिट जप्त करतील. ज्यांनी सेनेच्या पाठित खंजीर खुपसला त्यांचे काय झाले, हे सर्वांना माहिती आहे. पवारसाहेबांना फसवणाऱ्यांना इथली जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’, असा दावा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.’प्रत्येक वॉर्डीत एकच तिकीट असते. पक्ष तीन आहेत, नवी मुंबईत एकाधिकारशाही मोडायची असेल तर आपल्याला नीट वागावे लागेल. ज्यांना तिकीट देणार त्यांना निवडून द्या’, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.