Notifications

पैशांच्या व्यवहारातून व्यापाऱ्याचे चिंचवड येथील घरातून अपहरण; उर्से गावच्या माजी सरपंचासह तिघांवर अपहरणाचा गुन्हा

By PCB Author

December 12, 2018

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – पैशाच्या व्यवहारातून एका व्यापाऱ्याचे चिंचवड येथील त्याच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याचे अपहरण शुक्रवारी (दि.७) पहाटे साडेपाचच्या सुमारास चिंचवड येथील इंदिरानगर, शिवकृपा हौसिंग सोसायटी, फ्लॅट नं.६ या त्यांच्या घरातून करण्यात आले.