पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ 

0
271

हिंजवडी, दि.15 (पीसीबी): पैशाची मागणी करत पती, सासू आणि सासर्‍याने विवाहितेचा छळ केला. याबाबत विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2019 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत लवळे, इनामदार वस्ती, ता. मुळशी येथे घडला.

पती प्रभाकर संजय राऊत (वय 28), सासरे संजय एकनाथ राऊत आणि सासू (सर्व रा. लवळे, इनामदार वस्ती, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पतीसह नांदत असताना आरोपींनी आपसात संगणमत करून विवाहितेकडे पैशांची मागणी केली. त्यावरून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादी यांनी माहेरी आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्या तक्रार अर्जावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे