पेपर टाकण्यासाठी आलेल्या ‘त्या’ तरुणाने केले महिलेसोबत गैरवर्तन

0
258

चिंचवड, दि.२७ (पीसीबी) : पेपर टाकण्यासाठी आलेल्या तरुणाने घरातील महिलेसोबत गैरवर्तन केले ..हि घटना शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता घडली .. चिंचवड मधील दळवीनगर मधील या महिलेने या संबंधी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे .. महिलेच्या फिर्यादीनंतर या पेपर टाकणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे …

अनिल बाबू झिले (वय २८,रा. दळवीनगर झोपडपट्टी ,चिंचवड )असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे .. या बाबत चिंचवड पोलीस ठाण्यात या महिलेने फिर्याद दिली आहे ..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपी अनिल हा घरोघरी पेपर टाकण्याचे काम करतो .. शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास तो दळवीनगरच्या अपार्टमेंट मध्ये पेपर टाकण्यासाठी गेला होता तेव्हा तो जिना उतरत असताना संबंधित महिला हि पिण्याचं पाणी घेऊन जिना चढत असताना त्याने तिचा हाथ पकडून गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला .. पोलिसांनी आरोपी अनिल याला अटक केली आहे .. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत