Desh

पेट्रोल-डिझेल दरवाढ, नागरिकांसाठी महागाईची झळ कायम

By PCB Author

September 29, 2018

नवी दिल्ली, दि.२९ (पीसीबी) – पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला आहे. कारण आजही (दि.२९) इंधनाच्या किंमतीत वाढ झाली असून पेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले आहे. या ताज्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर ९०.७५ रुपये प्रति लिटरवर गेला असून डिझेल ७९.२३ रुपये प्रती लिटरपर्यंत पोहोचले आहे.

सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीयबाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.