Others

पॅसेंजर म्हणून बसलेल्या दोघांनी रिक्षा चालकाला धारदार हत्याराने मारले

By PCB Author

October 07, 2021

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – पॅसेंजर म्हणून रिक्षात बसलेल्या दोन जणांनी रिक्षाचालकाला धारदार वस्तूने मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री पावणे नऊच्या सुमारास भाटनगर ते सर्वधर्मीय स्मशानभूमी, चिंचवड रोडवर घडली.

सचिन हनुमंत गायकवाड (वय 38, रा. चापेकर चौक, वेताळ नगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. 6) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष सुभाष शिंदे (वय 20, रा. गांधी नगर, पिंपरी), नीलेश निकाळजे (रा. पत्राशेड, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या रिक्षामध्ये पॅसेंजरचा बहाणा करून बसले. फिर्यादी रिक्षा चालवत असताना आरोपीने कशाच्या तरी धारदार वस्तूने फिर्यादीच्या पाठीवर व दंडावर मारले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. पोलीस हवालदार कुंभार तपास करीत आहेत.