Bhosari

पूर्व वैमनस्यातून एकावर चाकूने वार; एकाला अटक

By PCB Author

October 27, 2020

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण करीत चाकूनेही वार केले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.

खाजु तुराब सय्यद (वय 35) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी सोमवारी (दि. 26) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंटी ऊर्फ राजकुमार अभिमन्यू थोरात (वय 21, दोघेही रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी तू शिवीगाळ का केली. माझ्या वडिलांना मारहाण का केली, अशी विचारणा फिर्यादी खाजु यांना करीत आरोपीने शिवीगाळ केली. तू शिवीगाळ करतो, अशी विचारणा खाजु यांनी केली असता आरोपीने रस्त्यावर पडलेल्या दगडाने मारहाण केली. त्यानंतर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. पोलिसांनी आरोपी बंटी याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.