पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करून लुटले

0
291

दापोडी, दि. १४ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार केले आणि त्यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून चोरून नेली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना दापोडी येथे बुधवारी (दि. 12) रात्री घडली.

साहिल काची ऊर्फ वाल्मिकी (रा. फुगेवाडी), विक्रम ऊर्फ विकी महेंद्र यादव (वय 24), प्रितम ऊर्फ पित्तू यादव (वय 24, दोघेही रा. दापोडी) आणि दुचाकीवरील अनोळखी व्यक्‍ती अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विक्रम आणि प्रितम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नईम सलीम शेख (वय 26, रा. पवार वस्ती, दापोडी) असे यांनी गुरुवारी (दि. 13) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे यापूर्वी भांडण झाले होते. ते भांडण मिटवून घेऊ असे सांगत आरोपींनी फिर्यादी यांना सोबत चलण्यास सांगितले. फिर्यादी नईम हे आरोपींसोबत गाडीवर जात असताना त्यांना आरोपींजवळ कोयता आणि बांबू असल्याचे दिसले. यामुळे नईम यांनी गाडीवरून खाली उतरून आपल्या घराकडे पळ काढला. त्यानंतर आपली गाडी घेऊन ते पोलीस चौकीकडे जात असताना दापोडीतील विनियार्ड चर्चजवळ आरोपींनी फिर्यादी यांना अडविले. नईम यांना बांबूने मारहाण करीत कोयत्याने हातावर वार करून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.