पूर्ववैमनस्यातून तरुणाला चिकन तोडण्याच्या सत्तूरने मारहाण

0
452

रहाटणी,दि.२४(पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला चार जणांनी मिळून गज आणि चिकन तोडण्याचा सत्तूरने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 20) रहाटणी येथे घडली.

प्रदीप राजेंद्र मोरे (वय 25, रा. गाडीतळ, हडपसर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मळू गेरंगे, आकाश भिसे, लखन गेरंगे, सोमनाथ गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी मोरे यांना रहाटणी येथील मंगलनगर वाकड रोड ते कोकणे चौक येथे गाठले. आरोपींनी केबल वायर, लोखंडी गज आणि चिकन तोडण्याच्या सत्तूरने मोरे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये मोरे गंभीर जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.