Pimpri

पूर्ववैमनस्यातून चौघांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला : दहा जणांवर गुन्हा दाखल

By PCB Author

April 18, 2022

पिंपळे गुरव, दि. १८ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांना रस्त्यात अडवून दहा जणांनी कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी अकरा वाजता पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल उर्फ कांड्या पप्या काशीद, सचिन उर्फ टकल्या मेजर कोळेकर, शाम शिंगे, प्रसाद सोनटक्के, दीपक बागडे, पप्या गायकवाड (सर्व रा. पिंपळे गुरव), मनोज सरकार, भावेश सरकार (दोघे रा. कासारवाडी), प्रसाद कदम, खंड्या साळुंखे (दोघे रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपक लुंडा कोकाटे (वय 18, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र राज अनिल पाटील, किशोर वसंत काटे, अभिषेक बारटक्के, मतिन शेख, कृष्णा दीपक मोहिते, विशाल फडके असे दुचाकींवरून जात होते. काशीद नगर पिंपळे गुरव येथे त्यांना आरोपींनी अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ व हाताने मारहाण केली.

आरोपी विशाल आणि दीपक यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात, पाठीवर, पायावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. अन्य आरोपींनी जवळच मंदिरात लपवलेले कोयते आणले. किशोर काटे याच्या तोंडावर, डोक्यावर, मतिन शेख याच्या कानावर, डोक्यावर, अभिषेक बारटक्के याच्या डोक्यावर कोयता, पालघन, सिमेंटचा गट्टू मारून जखमी केले. किशोर काटे याच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. सांगवी पोलीस तपास करीत आहे