Maharashtra

पूरग्रस्त शिरोळमध्ये ५०० घरे बांधणार – नाना पाटेकर

By PCB Author

August 14, 2019

कोल्हापूर, दि. १४ (पीसीबी) –  अभिनेते नाना पाटेकर यांनी शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयाला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा, अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर काळजी करू नका सगळे काही नीट होईल आपण सगळे मिळून तुमचे दुःख दूर करु,  असा धीर त्यांनी आज (बुधवार) पूरग्रस्तांना दिला. 

शिरोळमध्ये ५०० घरे बांधणार  आहे, असे  नाना पाटेकर यांनी  सांगितले.  शासनाने काही निधी दिला आहे. बाकीचे पैसे आम्ही देतो आहे. मला यासाठी कोणतंही श्रेय नको जे काही करतोय ते आपण सगळे करतो आहोत असेही  त्यांनी  स्पष्ट केले आहे.  आपण सगळ्यांनी मिळून या आपत्तीला तोंड दिले पाहिजे, आपण देतो आहोत, त्यामुळे रडायचे नाही,  असे  नाना पाटेकर  म्हणाले .

नाम, नाना पाटेकर, मकरंद असे आम्हाला श्रेय घ्यायचे नाही. प्रत्येकाने आपला वाटा उचलायाचा आहे, आत्ताही अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु आहे. मी मदत करणार म्हणजे काय? तर मीदेखील झोळी घेऊन लोकांकडेच पैसे मागणार लोक देतात त्यांना विश्वास वाटतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. जिथे जिथे कमतरता भासेल तिथे आम्ही उभे राहतोच आहोत, असेही नाना पाटेकर म्हणाले.