Maharashtra

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उर्मिला मातोंडकर सरसावल्या

By PCB Author

August 14, 2019

कोल्हापूर, दि. १४ (पीसीबी) – कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापुराचा विळखा सैल होऊ लागला आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, पूरसंकटानंतर आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या समस्या निर्माण होऊ नये, यासाठी युध्दपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ  कायम आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सुध्दा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी  हात पुढे केला आहे.

प्रार्थनेसाठी जोडलेल्या २ हातांपेक्षा मदतीसाठी सरसावलेला १ हात कधीही महत्वाचा असतो. मी मदत करून खारीचा वाटा उचललाय. तुम्हीही मदत करा, असे उर्मिलाने म्हटले आहे. उर्मिलाने सांगली कोल्हापूर गाठत पूरग्रस्तांना मदतीचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत. पूर पीडितांना कष्ट, त्रास, अपेष्टा  यापासून स्वतंत्र करण्यासाठी हा स्वातंत्र्य दिन त्यांच्यासाठी समर्पित, अशा आशयाचे ट्वीट उर्मिलाने मातोंडकर यांनी केले आहे.