पूनम, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारले? अजित पवारांचा पूनम महाजनवर निशाणा

0
667

बारामती, दि. १८ (पीसीबी) –  भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. ही टीका राष्ट्रवादीला चांगलीच झोंबली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पूनम यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पूनम यांच्यावर हल्ला चढवला आहे.

पूनम, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारले?, महाजन कुटुंबात एवढे मोठे रामायण कशामुळे घडले?, आम्ही पातळी सोडत नाही याचा अर्थ आम्ही काहीही सहन करणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी  पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबईत आयोजित एका सभेत बोलताना  खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांना ‘शकूनी मामा’असे म्हटले होते. या विधानाला राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  चोख प्रत्युत्तर दिले होते.