Pune

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मोठी ‘अपडेट’: शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना अखेर पोलिसांनी…

By PCB Author

July 16, 2021

पुणे, दि.१६ (पीसीबी) : काही महिन्यांपूर्वी राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना आता पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती समोर येत आहे. तरुणीच्या आई वडिलांनी पुणे पोलिसांसमोर जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. त्यामुळे आता या प्रकरणानंतर राठोड मंत्रिमंडळात पुन्हा वापसी करण्याचा मार्ग खुला झाल्याची चर्चा रंगतेय.

दरम्यान, पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांकडे दिलेल्या जबाबामध्ये स्पष्ट केलं आहे कि, ‘आमचा कोणावरही आरोप नाही, मुलीच्या मृत्यूनंतर या विषयाला राजकीय वळण दिले गेले. त्यानंतर जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता.’

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांचे नाव आले होते. त्यामुळे राठोड यांनी पूजाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर राहत राजीनामा दिला होता. मात्र आता पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल केलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.