Notifications

पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत स्टॅन्ड-अप कॉमेडी स्पर्धेचे आयोजन

By PCB Author

August 23, 2019

पुणे दि. २३ (पीसीबी) – पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमांतर्गत स्टॅन्ड-अप कॉमेडी स्पर्धाचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.

मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यात १६ जुलै ते २१ ऑगस्ट, या कालावधीत स्टँडअप कॉमेडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर पात्र ठरलेल्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. या ३६ जिल्ह्यातून विजेता आणि उपविजेता ठरलेल्या निवडक स्पर्धकांचा महाअंतिम सोहळा २५ ऑगस्ट सायं सहाच्या सुमारास गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून करण्यात आले आहे.